वाळू तस्करांनी धुडकावला उपसाबंदीचा आदेश

October 11, 2010 1:16 PM0 commentsViews: 54

प्रशांत बाग, जळगाव

11 ऑक्टोबर

हायकोर्टाच्या आदेशाने राज्यातील सर्वच नदीपात्रातून वाळू उपसा करण्यास बंदी घालण्यात आली आहे. पण जळगावला मात्र वाळू तस्करांनी हा आदेश पार धुडकावून लावला आहे. प्रशासनाने कितीही कारवाई केली, तरीही नदीपात्रातून रेतीचा बिनधास्त उपसा हे रेती माफिया करत आहेत.

जळगावची गंगा म्हणून ओळखल्या जाणार्‍या गिरणा नदीत हा वालूउपसा बिनदिक्कतपणंे सुरू ाहे. दोनच दिवसांपूर्वीच्या नियोजन बैठकीत राजकारण्यांनी वाळू उपशावरुन प्रशासनाला धारेवर धरले होते. कारवाईची नुसती भाषाच, पण जे आम्हाला दिसते ते पोलीस, आरटीओ आणि महसूलच्या अधिकार्‍यांना दिसत नाही. दुसरीकडे परमीट बंद केल्याने आमच्यावरच उपासमारीची वेळ आल्याचे या वाळू माफियांचे म्हणणे आहे.

रेतीचे ठेके लवकर सुरु केले नाहीत, तर नाईलाजाने आम्हाला हत्यार उचलावे लागेल, असा भलताच सूर या रेती व्यावसायीकांचा होता.

सरकारने कितीही कारवाई केली तरी आम्ही हा रेतीचा उपसा करणारच, अशी भूमिका या माफियांची आहे. एकीकडे सरकारची निर्बंधांची भाषा आणि दुसरीकडे अधिकार्‍यांचाच आशिर्वाद ! वाळू तस्करीचा धंदा असा बिनभोबाट सुरू आहे.

close