जव्हारमधल्या नांगरमोड्यात साजरी होतेय आदिवासींची दिवाळी

October 29, 2008 7:46 AM0 commentsViews: 12

29 ऑक्टोबर, जव्हारअलका धुपकरआदिवासींमध्ये दिवाळीचा सण तीन दिवसांसासाठी साजरा केला जातो. पण त्याची तयारी पाच दिवस आधीपासून सुरु होते. पणत्या, मेणबत्त्या आणि फटाके या गोष्टी सध्याच्या काळात आदिवासी पाड्यांवर पोहचल्यात. तरीही दिवाळीत भगतांची होणारी पूजा, अंगात घुमणारं वारं आणि तारप्याच्या तालावर केला जाणारा नाच हेच आदिवासींच्या दिवाळीचं खास वैशिष्ट्य.जव्हारच्या बाजारपेठेत दिवाळीच्या खरेदीची ग़डबड असते. दिवाळीनिमित्त आदिवासी बायका बांगड्या भरतात, तर कोणी चांदीचे दागिने आणि केसात माळायची प्लॅस्टिकची फुलं घेतात. दिवाळीतआदिवासी तंबाखूचीही होलसेल खरेदी करतात. याशिवाय प्रत्येक जण खरेदी करतो ते सुकलेले मासे आणि कोंबडी. कारण आदिवासींसाठी मासे आणि कोंबडी हाच असतो त्यांचा दिवाळीचा फराळ.संध्याकाळ होताच तारप्यावरच्या नाचाची तयारी पाड्यापाड्यात दिसते. बांबू आणि दुधी भोपळ्यापासून बनवलेलं तारपा हे खास आदिवासी वाद्य वाजू लागतं आणि बायका, पुरुष आणि मुलं या नाचात एकत्र फेर धरतात. दिवाळीच्या दिव्यांनी मातीची घरं उजळून निघतात कुठे फुलबाज्याही तडतडतात आणि सुरु होतो आदिवासींचा खरा सण.

close