ऊसदरासाठी आंदोलनाचा इशारा

October 11, 2010 2:17 PM0 commentsViews: 1

11 ऑक्टोबर

शेतकर्‍याच्या उसाला योग्य भाव मिळाला नाही तर उसाचा हंगाम सुरु होऊ देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.

सध्या सुरू असलेले साखर कारखाने आणि त्याची गाळप क्षमता लक्षात घेता एप्रिलनंतर एकही साखर कारखाना सुरू राहू शकणार नाही. तरीही राज्य सरकार हंगाम सुरू होण्याआगोदर शिल्लक उसाला नुकसान भरपाई जाहीर केली आहे.

सरकारची ही घोषणा शेतकर्‍यांची दिशाभूल करणारी आहे, असेही खासदार राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. 15 ऑक्टोबरला स्वाभिमान संघटना यासाठी आंदोलन करणार आहे.

close