रत्नागिरीत गाळामुळे मासेमारी अडचणीत

October 11, 2010 2:46 PM0 commentsViews: 58

11 ऑक्टोबर

रत्नागिरीच्या राजीवडा खाडी मुखाजवळचा गाळ गेल्या कित्येक वर्षापासून काढला गेला नसल्यामुळे मच्छिमारांना आपल्या नौका समुद्रात नेताना अडचणी येत आहेत.

रत्नागिरीच्या समुद्रात मासेमारीसाठी येणार्‍या 300 ते 400 नौका वारंवार या गाळात रुतून बसतात. विशेषत: ओहोटीच्या वेळी गाळ आणि समुद्राच्या दरम्यान सँडवॉल तयार होत असल्यामुळे नौकांना मासेमारीसाठी जाता येत नाही.

बंदर विकास राज्य मंत्री भास्कर जाधव यांनी तातडीची पाहणी करुन यावर कायमस्वरुपी तोडगा काढावा, अशी मागणी मच्छिमारांनी केली आहे. ऐन मासेमारीच्या हंगामात मच्छीमारांचे दिवस वाया जात असल्यामुळे मच्छीमार हवालदिल झाले आहेत.

close