बहुमत पुन्हा सिद्ध करा

October 12, 2010 10:15 AM0 commentsViews: 2

12 ऑक्टोंबर

कर्नाटकमध्ये राजकीय संघर्ष शिगेला पोहचला आहे. मुख्यमंत्री येडियुरप्पांनी काल बहुमतसिंद्ध केले होते.

पण आज राज्यपाल हंसराज भारद्वाज, यांनी हे विश्वासमतच रद्द केले.

तसेच 14 तारखेला येडियुरप्पांना पुन्हा बहुमत सिद्ध करायला सांगण्यात आले. राज्यपालांनी हे आदेश दिले आहे.

राज्यपालांनी पहिल्यांदा बहुमत सिद्ध करायला सांगितल्यानंतर भाजपने सकाळी त्याला नकार दिला.

पण संध्याकाळ होईपर्यंत मात्र भाजपने घूमजाव केला आणि ही ऑफर स्वीकारली.

येडियुरप्पा सरकारला आता 14 तारखेला पुन्हा संख्याबळ सिद्ध करावे लागेल. त्यामुळे आमदारांच्या जुळवाजुळवीला नव्याने सुरवात झाली.

तर दुसरीकडे 16 आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवरची सुनावणी कर्नाटक हायकोर्टाने 18 तारखेपर्यंत पुढे ढकलली आहे.

close