आरटीआयला 5 वर्ष पूर्ण

October 12, 2010 10:38 AM0 commentsViews: 1

12 ऑक्टोंबर

आरटीआय अर्थात माहिती अधिकाराच्या कायद्याला आज 5 वर्ष पूर्ण होत आहे.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि अनेक सामाजिक कार्यकर्त्यांच्या रेट्यामुळे सरकारला हा कायदा करावाच लागला.

या कायद्यामुळे सरकारी नोकरशाही आणि व्यवस्थेत माजलेल्या भ्रष्टाचाराला चाप बसेल अशी अपेक्षा होती.

ती काही प्रमाणात पुरीही झाली. मात्र याचवेळी या कायद्याचा चक्क ब्लॅकमेलिंगसारखा वापर करण्याचे प्रकारही काही ठिकाणी घडले.

सर्वात दुदैर्वाची बाब म्हणजे या कायद्याचा प्रामाणिकपणे वापर करुन भ्रष्टाचाराच्या किडीला नष्ट करू पाहणार्‍या कार्यकर्त्यांच्या हत्या ही झाल्या पण यामुळे आरटीआय कार्यकर्ते डगमगले नाहीत, उलट अधिक जोमाने लढा देत आहे.

आता गरज आहे, ती सरकारने त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची..

आर के लक्ष्मण यांच्या शुभेच्छा

ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर के लक्ष्मण यांनीही माहिती अधिकार कायद्याला 5 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.

आपल्या कार्टूनच्या जीवनप्रवासात कायम कॉमन मॅनलाच केंद्रभागी ठेवून, सरकारी व्यवस्थेला चिमटे काढणार्‍या आर केंच्या शुभेच्छा ही, या सामान्यांच्या असामान्य लढ्यासाठी मोलाच्या आहेत.

close