अंबरनाथमध्ये दुसर्‍या दिवसही रिक्षा बंद

October 12, 2010 11:28 AM0 commentsViews: 1

12 ऑक्टोंबर

अंबरनाथमध्ये आज सलग दुसर्‍या दिवशीही ऑटो रिक्षांचा बंद सुरू आहे. या बंदमध्ये 8 हजार रिक्षाचालक सहभागी आहेत.

त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत आहे. खाजगी बसेस, रस्त्यांवरचे खड्डे आणि पोलिस लाठीचार्जच्या विरोधात हा बंद पुकारण्यात आला आहे.

अंबरनाथ शहरात पालिका दसर्‍यापासुन खाजगी बस सेवा सुरवात करणार आहे या खाजगी बस सेवेला रिक्षा चालकांचा विरोध आहे.

तसेच रस्त्यावर पडलेल्या खड्‌ड्यांच्या विरोधात काल शहरातील 8000 रिक्षा चालकांनी रिक्षा बंद आदोलन पुकारले होते.

close