नव्या वर्षाच्या स्वागतासाठी गुजरातची जय्यत तयारी

October 29, 2008 7:48 AM0 commentsViews: 4

29 ऑक्टोबर, गुजरातब्युरो रिपोर्टगुजराती लोकांसाठी सध्या उत्सवांची धूम आहे. गुजरातमध्ये दोन-दोन उत्सवांची तयारी सुरू आहे. लोक सध्या दिवाळी साजरी करत आहेत. त्यानंतर एका दिवसानी गुजराती समाजाचं नवीन वर्षं सुरू होतं आहे. अर्थातच इथली सगळी कुटुंबं सणांच्या तयारीत गुंतलेले दिसतात. पारंपरिक रांगोळी काढून सण साजरा करण्यासाठी त्यांची लगबग सुरू आहे.तर महिलांची तयारी काही आठवड्यांपासून सुरू आहे. घराची रंगरंगोटी करण्यात आली आहे. तसंच पारंपरिक गुजराती खाद्यपदार्थ तयार केले जात आहेत. आता ते वाट बघत आहेत ती नव्या वर्षाची.सणांचा उत्साह आता शिगेला पोहचला आहे. पण, बाजारात मात्र त्याचा फारसा परिणाम जाणवत नाहीये. शेअर बाजारातली घसरण आणि आर्थिक मंदीचा फटका जाणवतोय. तरीही सणासुदीला खरेदी केल्याशिवाय सण साजरा कसा करणार ? एकूणच गुजराती माणसाचा आशावादी स्वभाव इथेही दिसून येतो. ' बाजारात मंदी आहे. पण, नव्या वर्षात परिस्थिती बदलली तर चांगलं होईल. ' अशी प्रतिक्रिया जनक पटेल या नागरिकाने दिली.थोडक्यात काय तर नवं वर्ष सुख, समृद्धी आणि भरभराट घेऊन येईल अशी आशा लाखो गुजराती बांधवांना आहे. त्यांच्या या सार्‍या इच्छा पूर्ण होवोत यासाठी आयबीएन लोकमतच्या शुभेच्छा.

close