नरसिंग यादवचे मुंबईत जल्लोषात स्वागत

October 12, 2010 5:47 PM0 commentsViews: 1

12 ऑक्टोंबर

कॉमनवेल्थ गेम्समध्ये कुस्तीत भारताला गोल्ड मेडल मिळवून देणार्‍या नरसिंग यादवचे आज मुंबईत आगमन झाले.

मुंबई एअर पोर्टवर त्याचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. नरसिंगचे कुटुंबिय, मित्र परिवार तसंच क्रीडाप्रेमींनी एअरपोर्टवर एकच गर्दी केली.

ढोल-ताशांच्या गजरात त्याचे स्वागत करण्यात आले. मुंबई एअरपोर्ट ते तो राहत असलेल्या जोगेश्वरीपर्यंत त्याची रथातून मिरवणूकही काढण्यात आली.

शालेय विद्यार्थीही शुभेच्छांचे फलक झळाकवत मिरवणुकीत सहभागी झाले होते. 74 किलो वजनी गटात नरसिंग यादवने फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या रिचर्ड आर्डिनलचा पराभव केला होता.

close