लालूंपेक्षा राबडीदेवी श्रीमंत

October 12, 2010 5:51 PM0 commentsViews: 1

12 ऑक्टोंबर

राष्ट्रवादी काँग्रेस बिहार विधानसभेच्या 243 पैकी 200 जागा लढवणार आहे. 107 उमेदवारांची पहिली यादी आज पक्षाने जाहीर केली.

दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर आता धक्कादायक गोष्टी उघड होत आहेत. विरोधी पक्षनेत्या राबडी देवी या आपले पती लालूप्रसाद यादव यांच्यापेक्षा देखील श्रीमंत आहेत.

प्रतिज्ञापत्रात राबडीदेवी यांनी आपली मालमत्ता 1 कोटी 4 लाख रुपये असल्याचे सांगितले आहे. तर लालूंची मालमत्ता आहे अवघी 22 लाख रुपये…राबडीदेवींचे बँक बॅलेन्ससुद्धा लालूंपेक्षा जास्त आहे.

close