खेळात भारताची विजयी त्रिवेणी

October 12, 2010 6:14 PM0 commentsViews: 2

12 ऑक्टोंबर

भारतासाठी आजचा दिवसत्रिवेणी विजयी ठरला आहे. कॉमनवेल्थ गेम्स स्पर्धेत भारतीय महिलांनी ऍथलेटिक्समध्ये इतिहास रचला आहे तर हॉकीत फायनलला पोहचला आहे.

तसेच बंगळुरू टेस्टमध्ये सचिनने आज डबल सेंच्युरी ठोकली आणि टेस्ट क्रिकेटमध्ये 14 हजार रन्स पूर्ण करण्याचा रेकॉर्ड केला आहे

कॉमनवेल्थमध्ये महिला टीमने रचला आणखी एक इतिहास

कॉमनवेल्थ गेम्स स्पर्धेत भारतीय महिलांनी ऍथलेटिक्समध्ये आणखी एक इतिहास रचला आहे.

4 बाय 400 मीटर शर्यतीत भारतीय महिलांनी गोल्ड मेडलची कमाई केली. धावण्याच्या शर्यतीत भारतीय महिलांनी पटकावलेले हे पहिले गोल्ड मेडल ठरले आहे.

भारतीय टीममध्ये मनजीत कौर, सिनी जोस, आश्विनी आणि मनदीप कौर यांचा समावेश आहे. या टीमने 3 मिनिट आणि 27 पॉईंटं 77 सेकंदाची वेळ नोंदवत ही गोल्डन कामगिरी केली आहे. ऍथलेटिक्समधले भारताचे हे दुसरे गोल्ड मेडल ठरले आहे.

भारतीय खेळाडूंनी ऍथलेटिक्समध्ये गोल्ड बरोबरच आज आणखी चार ब्राँझ मेडल्सची कमाई केली.

4 बाय 100 मीटर शर्यतीत भारताच्या महिला आणि पुरुष टीमने ब्राँझ मेडल्स पटकावले तर भालाफेकीत भारताच्या काशिनाथ नायकने 74 पूर्णांक 29 मीटरची नोंद करत ब्राँझ मेडल मिळवले.

ट्रीपल जम्प प्रकारात रंजीत माहेश्वरीने सर्वोत्तम राष्ट्रीय वेळ नोंदवत ब्राँझ मेडलची कमाई केली.

भारतीय हॉकी टीम फायनलला

भारतीय हॉकी टीमनंही फायनलमध्ये धडक मारली आहे. भारत आणि इंग्लंड दरम्यान रंगलेली सेमीफायनलची ही मॅच जबरदस्त चुरशीची झाली.

निर्धारित 70 मिनिटांच्या खेळात दोन्ही टीम 3-3 अशा बरोबरीत होत्या. जादा वेळेतही दोन्ही टीमला एकही गोल करता आला नाही.

अखेर मॅच पेनल्टी स्ट्रोकमध्ये गेली. पहिले दोन गोल दोन्ही टीमच्या खेळाडूंनी सहज केले. पण भारताचा गोली भारत छेत्रीने इंग्लंडचा तिसरा गोल अडवला आणि इथंच भारताचा विजय पक्का झाला.

भारताने ही मॅच 5-4 अशी जिंकत हॉकीच्या फायनलमध्ये धडक मारली.

शुटिंगमध्ये गोल्ड

शुटिंगमध्ये भारताने आज एक गोल्ड तर दोन सिल्व्हर मेडल पटावली आहे. पुरुषांच्या 25 मीटर पिस्टल पेअर इव्हेंटमध्ये समरेश जंग आणि चंद्रशेखर कुमार चौधरी या जोडीनं सिल्व्हर मेडल जिंकले.

समरेशने 2006च्या मेलबर्न कॉमनवेल्थमध्ये याच प्रकारात रोनक पंडितच्या साहय्याने नवीन गेम रेकॉर्डसह गोल्ड पटकावले होते पण यावेळी मात्र त्यांना सिल्व्हर मेडलवर समाधान मानावे लागले.

सिंगापुरच्या बीन गे आणि मेंग पोहने गोल्ड मेडल पटकावले. शुटींगमध्ये भारताला सर्वात मोठा धक्का बसला तो 50 मीटर रायफल प्रोन प्रकारात भारताच्या गगन नारंग आणि हरिओम सिंग यांना मेडल पटकावता आले नाही.

गगनने आतापर्यंत गोल्ड मेडल मिळवली पण पाचवे गोल्ड मिळवण्यात त्याला आज यश आले नाही. त्याला सहाव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

सचिनची डबल सेंच्युरी

बंगळुरू टेस्टमध्ये सचिन तेंडुलकरने आणखी एक मास्टर इनिंग केली आहे. सचिनने आज डबल सेंच्युरी ठोकली. टेस्ट क्रिकेटमधली ही त्याची सहावी डबल सेंच्युरी ठरली.

टेस्टच्या तिसर्‍या दिवस अखेर 191 रन्सवर नॉटआऊट असलेल्या सचिनने आज डबल सेंच्युरी पूर्ण केली.

त्याआधी त्याने टेस्ट क्रिकेटमध्ये 14 हजार रन्स पूर्ण करण्याचा रेकॉर्ड केला होता.

डबल सेंच्युरीनंतर मात्र 214 रन्सवर सचिनला रोखण्यास ऑस्ट्रेलियाला यश मिळाले.

close