बंगलोर टेस्ट भारताच्या खिशात

October 13, 2010 9:44 AM0 commentsViews: 39

13 ऑक्टोबर

बंगलोर टेस्टमध्ये भारताने ऑस्ट्रेलियावर 7 विकेट राखून शानदार विजय मिळवला आहे. या विजयासोबतच 2 टेस्ट मॅचची ही सीरिज भारताने 2-0 अशी जिंकली आहे.

टेस्ट क्रिकेटमध्ये नंबर वन असलेल्या भारताने आपल्या लौकीकाला साजेशा खेळ करत विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी 207 रन्सचे आव्हान ठेवले होते.

याला उत्तर देताना भारताची सुरुवात खराब झाली. ओपनिंगला आलेला वीरेंद्र सेहवाग अवघ्या 7 रन्सवर आऊट झाला. तर मुरली विजयही 37 रन्स करुन पॅव्हेलिअनमध्ये परतला. पण आपली पहिलीच टेस्ट खेळणार्‍या चेतेश्वर पुजारीने संधीचे सोने केले.त्याने 72 रन्सची शानदार खेळी करत भारताला विजयाच्या मार्गावर आणले.

यानंतर सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांनी विजयाची औपचारिकता पूर्ण केली. पहिल्या इनिंगमध्ये सचिन तेंडुलकरने केलेल्या डबल सेंच्युरीच्या जोरावर भारताने हा विजय मिळवला. या आधी मोहाली टेस्ट भारताने एक विकेट राखून जिंकली होती.

close