डोपिंगचे गालबोट…

October 13, 2010 10:59 AM0 commentsViews:

13 ऑक्टोबर

कालच भारतीय ऍथलीट्सनं अक्षरश: सोन्यासारखी कामगिरी केली होती. पण आज मात्र या सुवर्ण कामगिरीला डोपिंगचे गालबोट लागले. राणी यादव डोपिंग टेस्टमध्ये दोषी आढळली आहे. कॉमनवेल्थ गेम्स फेडरेशनचे अध्यक्ष माईक फेनेल यांनी सुद्धा या बातमीला दुजोरा दिला आहे. डोपिंग टेस्ट केल्यानंतर एक भारतीय ऍथलिट त्यात पॉझिटीव्ह आढळल्याचे त्यांनी म्हटले आहे.

शूटर्स पुन्हा आघाडीवर

कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारतीय शूटर्सनी पुन्हा मेडल्सवर नेम साधला आहे. महिलांच्या 10 मीटर एअर पिस्टल मध्ये हिना सिंधूने सिल्व्हर मेडल पटकावले. फायनलची ही लढत जबरदस्त चुरशीची झाली.

मलेशियाच्या बीबीयाना सिंगने अखेर यात बाजी मारत गोल्ड पटकावले. बीबीयानाने 481.9 गुणांची कमाई केली, तर हिनाला मात्र 481.6 गुणांचीच कमाई करता आली. त्यामुळे फक्त 3 पॉईंटच्या फरकाने हिनाला गोल्ड मेडलने हुलकावणी दिली. याच प्रकारात भारताच्या अनुराज सिंगला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. दुसरीकडे शूटिंगमध्येच भारताच्या समरेश जंगनेही ब्राँझ मेडल पटकावले. 25 मीटर स्टँडर्ड पिस्टलमध्ये त्याने हे ब्राँझ मेडल पटकावले.

टेबल टेनिसमध्ये शानदार सुरुवात

टेबल टेनिसमध्येही भारताने शानदार सुरुवात केली आहे. टेबल टेनिसमध्ये पुरुषांच्या डबल्समध्ये भारताच्या शरथ कमल आणि सुभाजीत सहा जोडीने फायनलमध्ये प्रवेश केला. इंग्लंडच्या बॅगाले आणि पिचफोर्ड जोडीचा पराभव करत त्यांनी फायनल गाठली. त्यामुळे भारताचे आणखी एक मेडल मात्र पक्क झाले.

close