डोंबिवली शिवसेनेत बंडखोरी

October 13, 2010 11:09 AM0 commentsViews: 1

13 ऑक्टोबर

डोंबिवलीमध्ये शिवसेनेत बंडखोरी झाली आहे. डोंबिवली शिवसेना शहरप्रमुख सदानंद थरवळ यांनी राजीनामा दिला आहे. त्यांना तिकीट दिले गेले नाही म्हणून ते नाराज होते. त्यांच्यासोबत शिवसेनेच्या 12 शाखाप्रमुख आणि उपशाखाप्रमुखांनीही राजीनामे दिले आहेत. शिवसेनेच्या या सर्वपदाधिकार्‍यांनी आपले राजीनामे मातोश्रीवर पाठवले आहेत.

अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस

कल्याण डोंबिवली आणि कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. कल्याण डोंबिवली महपालिकेसाठी निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी झाली आहे. तर शिवसेना आणि भाजपचीही युती आहे.

तर मनसेने 100 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. आज शेवटचा दिवस असल्याने उमेदवारांची गर्दी होणार आहे. तर दुसरीकडे नाराजांनी बंडखोरी करु नये, यासाठी सर्वच पक्षांचे नेते कामाला लागले आहेत.

close