खाणीत अडकलेल्या 4 मजुरांना जीवदान

October 13, 2010 11:26 AM0 commentsViews: 1

13 ऑक्टोबर

चिलीमध्ये 69 दिवसांपासून एका खाणीत अडकलेल्या 33 मजुरांपैकी चार मजुरांना खाणीतून बाहेर काढण्यात यश आले आहे. अजून 29 मजूर खाणीतच आहेत. ही तांब्याची खाण आहे.

हे मजूर गेल्या 69 दिवसांपासून खाणीत अडकले आहेत. इतर 29 जणांना खाणीतून काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. एक एक करून या मजुरांना कॅप्स्युलद्वारे बाहेर काढले जात आहे.

या मजुरांना खाणीमध्ये जेवण, पाणी, ऑक्सिजन आणि सिगरेटसुद्धा पुरवली जात होती. हे बचाव अभियान जगातील सगळ्यात मोठे, नाट्यमय आणि कठीण बचाव कार्य समजले जात आहे. ही खाण 600 मीटर खोल आहे.

close