लेट लतिफ महापौरांना घड्याळ भेट

October 13, 2010 11:33 AM0 commentsViews: 1

13 ऑक्टोबर

मुबईच्या महापौर श्रध्दा जाधव नेहमीच पालिका सभागृहात उशिरा येत असल्यामुळे विरोधी पक्षनेते राजहंस सिंग यांनी लेट लतिफ महापौरांना आज घड्याळ भेट दिले.

आतापर्यंत महापालिकेच्या दर महिन्याला होणार्‍या सर्वसाधारण सभेत प्रत्येक वेळी महापौर तब्बल दीड ते पावणे दोन तास उशिरा आल्या आहेत.

काल झालेल्या सर्वसाधारण सभेची वेळ 3 वाजताची असतानाही प्रत्यक्षात पावणे चार वाजेपर्यंत महापौरांचा पत्ताच नव्हता. त्यामुळे सर्व नगरसेवक संतापले. वेळेवर येण्याच्या सूचना देऊनही महापौर उशिरा येत असल्याने विरोधी पक्षनेत्यांनी महापौरांना घड्याळ भेट देत वेळेवर येण्यास सुचवले आहे.

यावर सत्ताधारी नगरसेवकांनी मात्र मौन बाळगले आहे. तर महापौरांनीही कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

close