पॅथॉलॉजीने दिला एचआयव्हीचा चुकीचा रिपोर्ट

October 13, 2010 11:47 AM0 commentsViews: 3

13 ऑक्टोबर

एचआयव्ही टेस्टचा चुकीचा अहवाल दिल्याप्रकरणी जळगाव शहरातील एका पॅथॉलॉजीला प्रशासनाने टाळे ठोकले आहे.

सामाजिक कार्यात नेहमी पुढे असणारा चेहरा म्हणून ओळख असलेल्या डॉ. प्रभू व्यास यांच्या राम पॅथॉलॉजीवर जिल्हा प्रशासनाने ही कारवाई केली आहे.

डॉक्टर व्यास यांची वैद्यकीय पात्रताही संशयास्पद आहे, असे या विशेष कृती समितीचे म्हणणे आहे. योग्य ते वैद्यकीय शिक्षण नसताना पॅथ लॅब रिपोर्टवर सही करणार्‍या व्यास यांच्यावर कारवाई करण्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

पण हे सर्व आरोप डॉ. व्यास यांनी फेटाळून लावले आहेत. 2 महिन्यांपूर्वी झालेली चूक मान्य केल्यानंतरही कारवाई का करण्यात येत आहे, हा प्रश्न व्यास यांनी उपस्थित केला आहे. त्याचबरोबर आपल्याला ब्लॅकमेल करुन पैसे उकळण्याचे हे षडयंत्र असल्याचाही आरोपही त्यांनी केला आहे.

close