लवासाबद्दल आंबेडकरांचा राणेंना सवाल

October 13, 2010 1:22 PM0 commentsViews: 3

13 ऑक्टोबर

भारिपचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी लवासाबद्दल महसूल मंत्री नारायण राणेंना जाब विचारला आहे.

कोणत्या कायद्यांतर्गत लवासा नियमित करण्याचा निर्णय घेण्यात, आला याचे स्पष्टीकरण महसूलमंत्र्यांनी द्यावे, अशी मागणी आंबेडकर यांनी केली आहे.

तसेच कृष्णा खोरे महामंडळाची आणखी 440 हेक्टर जमीन लवासाला देण्याचा सरकारचा घाट असल्याचा गौप्यस्फोटही आंबेडकर यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

लवासाला नियमित करण्याचा अधिकार राणेंचाच आहे. आणि त्यासंबंधी त्यांनी काही निर्णय घेतले असतील, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी लवासा प्रकरणातून हात झटकले आहेत.

close