अंधांसाठी ब्रेल लिपीतला खास दिवाळी अंक – फुलोरा

October 29, 2008 7:57 AM0 commentsViews: 46

29 ऑक्टोबर, पुणेस्नेहल शास्त्रीझाले बहू, होतील बहू, परी या सम हा, असा एक दिवाळी अंक गेली काही वर्ष पुण्यातून निघत आहे. आणि तो आहे चक्क ब्रेल लिपीतला. मराठीतलं उत्तम साहित्य अंध मुलांनाही वाचायला मिळावं, यासाठी सरोज टोळे ' फुलोरा ' दिवाळी अंक एकहाती काढत आहेत. अनेक अंध मुलांना साहित्याचा लज्जतदार फराळ सापडला आहे तो फुलोरा या दिवाळी अंकात. हा ब्रेल लिपीतला दिवाळी अंक खासअंध मुलांसाठी तयार करण्यात आला आहे. फुलोराचा हा अंक तयार केलाय तो सरोज टोळे यांनी. गेली सहा वर्ष त्या हा अंक एकहाती बनवत आहेत. ' फुलोरा' चा हा दिवाळी अंक डिसेंबर महिन्यात निघतो. या अंकात अनेक नामवंत साहित्यिकांचे लेख असतात. सुरूवातीला तर त्यांना हा अंक टाईपरायटरवर करावा लागत असे. ' अंध मुलं आकाशदिवा कशी तयार करू शकतात, तर आम्ही त्यांच्याकडून आकाशदिवा करून घेतो. म्हणजे त्यांची क्रिएटिव्हिटी थोडक्यात म्हणजे त्यांना नाटकं आवडतात. नाट्यछटा आवडतात ते सगळं साहित्य आम्ही यात देतो ' अशी माहिती सरोज टोळे यांनी आयबीएन लोकमतला दिली.दिवाळी जवळ आली की सगळेजण जातात पेपरस्टॉलवर दिवाळी अंक खरेदी करायला, पण फुलोरा हा एक वेगळा अंक. हा वेगळा यासाठी की अंध विद्यार्थ्यांच्या आयुष्यात फुलासारखा टवटवीतपणा आणण्यासाठी सरोजताई सहा वर्ष काम करत आहेत. फुलोरा हा विद्यार्थ्यांसाठीचा ब्रेल लिपीतला पहिलाच दिवाळी अंक. तो मुलांना आणि त्यांच्या शाळांना विनामूल्य दिला जातो. अंधांच्या आयुष्यात फुलोरा फुलवणार्‍या सरोजताईंच्या या उपक्रमाला आयबीएन लोकमतच्या शुभेच्छा.

close