महापालिका निवडणूक रणधुमाळी रंगात

October 13, 2010 2:00 PM0 commentsViews: 2

13 ऑक्टोबर

कल्याण डोंबिवली आणि कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी झाली आहे.

तर शिवसेना आणि भाजपचीही युती आहे. मनसेने 100 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. आज शेवटचा दिवस असल्याने उमेदवारांची गर्दी होणार आहे. तर दुसरीकडे नाराजांनी बंडखोरी करु नये, यासाठी सर्वच पक्षांचे नेते कामाला लागले आहेत.

कोल्हापुरात रणधुमाळी

कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी आता रंगात आली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे निवडणूक कार्यालयात उमेदवारांनी मोठी गर्दी केली होती.

कोल्हापूरच्या 77 प्रभागांसाठी ही निवडणूक होत आहे. सगळेच पक्ष पूर्ण ताकदीनिशी रिंगणात उतरले आहेत. बंडखोरी होऊ नये म्हणून, अनेक पक्षांनी शेवटच्या क्षणी उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.

अर्ज भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी 1,453 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले. उद्या अर्जाची छाननी होणार आहे.

close