धर्मांतराच्या स्मृती जातायत काळाच्या पडद्याआड

October 13, 2010 2:28 PM0 commentsViews: 1

दीप्ती राऊत, नाशिक

13 ऑक्टोबर

मी हिंदू म्हणून जन्मला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही… डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या या घोषणेला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. धर्मांतराच्या या घोषणेचे साक्षीदार असलेल्या येवल्याच्या या स्मृती काळाच्या पडद्याआड जात आहेत.

धर्मांतराच्या घोषणेची साक्षीदार असलेली येवल्याची मुक्तीभूमी. आज इथे उभा आहे, अर्धवट बांधकामाचा फक्त एक स्तंभ…

13 ऑक्टोबर 1935 ला येवल्यात झालेल्या अखिल भारतीय दलित परिषदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा केली. त्यावेळी बाबासाहेब मोतीराम साबळेंच्या या घरी उतरले होते.

आज साबळेंच्या घराच्या कुडाच्या भिंती मातीच्या झाल्या… बाकी काही फारसा फरक पडला नाही. साबळेंचा पणतू संदीप काम करत आपले शिक्षण पूर्ण करत आहे. धर्मांतराच्या घोषणेचा इतिहास आपल्या पिढीपर्यंत धूसर झाल्याची त्याची खंत आहे.

संदीपच्या पिढीचा तरी यात काय दोष… ही मुक्तीभूमी त्यांच्यासाठी स्फूर्ती बनण्याऐवजी वादाच्या भोवर्‍यात सापडली आहे..

close