ऊस कामगारांना 18 टक्के वाढ

October 14, 2010 12:41 PM0 commentsViews: 43

14 ऑक्टोबर

महाराष्ट्रातल्या ऊस तोडणी कामगारांना 23 टक्के तर साखर कामगारांना 18 टक्के वाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी ही माहिती दिली. इतर राज्यांमध्ये कामगारांना दिल्या जाणार्‍या रकमेच्या तुलनेत महाराष्ट्रातल्या कामगारांना कमी पैसे मिळत असल्यानी संप करण्याचा इशारा कामगार संघटनांतर्फे देण्यात आला होता.

त्यापार्श्वभूमीवर त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली होती. त्या समितीने हा निर्णय घेतला आहे.

close