दसर्‍यापूर्वीच लुटले सोने…

October 14, 2010 12:46 PM0 commentsViews: 2

14 ऑक्टोबर

कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारतीय खेळाडूंनी दसर्‍यापूर्वीच सोने लुटले आहे.

स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी भारताने आणखी 2 गोल्ड, एक सिल्व्हर आणि 2 ब्राँझ मेडलची कमाई केली.

भारताने स्पर्धेत मेडल्सची सेंच्युरी तर पूर्ण केलीच शिवाय स्पर्धेत दुसरे स्थानही कायम ठेवले.

भारताच्या खात्यात 101 मेडल्स जमा झाली आहेत.

सायनाने पटकावले गोल्ड

कॉमनवेल्थ गेम्सच्या शेवटच्या दिवशी सायनाने भारतासाठी 38वे गोल्ड मेडल पटकावले. जबरदस्त चुरशीच्या झालेल्या फायनलमध्ये सायना नेहवालने मलेशियाच्या म्यु चु वाँगचा पराभव केला.

वाँगने पहिला सेट 21-19 असा जिंकत मॅचममध्ये आघाडी घेतली. दुसरा सेट जबरदस्त अटीतटीचा झाला.

पण या सेटमध्ये सायनाने 23-21 अशी बाजी मारली. तिसर्‍या आणि निर्णायक सेटमध्ये मात्र सायनाने वाँगला लढण्याची फारशी संधी दिली नाही.

जागतिक क्रमवारीत तिसर्‍या क्रमांकावर असलेल्या सायनाने तिसरा सेट 21-13 असा सहज जिंकला आणि गोल्डवर कब्जा केला.

भारताच्या कॉमनवेल्थ गेम्स इतिहासात बॅडमिंटनमध्ये गोल्ड मेडल मिळवून देणारी सायना पहिली भारतीय महिला ठरली आहे.

सायनाच्या या गोल्डन कामगिरीमुळे भारताने स्पर्धेत इंग्लंडला मागे टाकत दुसर्‍या क्रमांकावर झेप घेतली.

बॅडमिंटनमध्ये गोल्ड

त्याआधी बॅडमिंटनच्या महिला डबल्समध्ये भारताने गोल्ड मेडल जिंकले. बॅडमिंटनच्या महिला डबल्समध्ये ज्वाला गुट्टा आणि आश्विनी पोनप्पा जोडीने ही कमाल केली.

फायनलमध्ये त्यांनी सिंगापूरच्या सिन सारी आणि यावो लेई जोडीचा पराभव केला.

अटीतटीच्या झालेल्या या मॅचमध्ये भारतीय जोडीने 21-16 आणि 21 – 19 असा पराभव करत गोल्ड मेडल पटकावले.

तब्बल 28 वर्षानंतर भारताने कॉमनवेल्थ स्पर्धेत बॅडमिंटनमध्ये ही कामगिरी केली. भारताचे या स्पर्धेतील हे 37 वे गोल्ड मेडल ठरले आहे.

close