नालासोपार्‍यात बहीण-भावाचा नरबळी

October 16, 2010 2:05 PM0 commentsViews: 11

16 ऑक्टोबर

मूल होण्यासाठी नालासोपार्‍यात नरबळीची एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

इथे दोघा बहीण-भावांचा बळी दिल्याची घटना उघड झाली आहे.

ओम विशाल जयस्वाल आणि त्याची बहीण ऋतिका जयस्वाल या दोघांचा यात नाहक बळी गेला आहे. ओम पाच वर्षांचा तर ऋतिका अडीच वर्षांची होती.

या मुलांच्या मामा-मामीने अपत्यप्राप्ती होत नाही म्हणून या दोन मुलांची गळा दाबून हत्या केली.

धक्कादायक बाब म्हणजे हा प्रकार होत असताना या मुलांचे आई-वडिलही तिथे हजर होते.

पोलिसांनी आईवडिलांसह सातजणांना ताब्यात घेतले आहे.

close