…उत्सुकता युवासेनेची

October 17, 2010 11:45 AM0 commentsViews: 2

17 ऑक्टोंबर

दरवर्षी होणारा शिवसेनेचा दसरा मेळावा हा महाराष्ट्राच्या राजकारणात निर्णायक ठरत असतो.

यंदाच्या वर्षी दसरा मेळाव्याच्या निम्मिताने ठाकरे घराण्याची तिसरी पिढी आदित्य ठाकरे यांच्या रुपाने राजकारणात दाखल होत आहे. याची उत्सुक्ता महाराष्ट्राला लागली आहे.

आज संध्याकाळी शिवाजी पार्कवर शिवसेना मेळावा साजरा होत आहे. आणि आज या मेळाव्यात आदित्य ठाकरेंचा राजकारणात प्रवेश होणार आहे.

आदित्यच्या नेतृत्वाखाली आज युवा सेनेची घोषणा केली जाणार आहे. संध्याकाळी शिवाजी पार्कवर ग्रँन्ड लॉन्चिग होणार आहे.

त्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंसह शिवसेनेच्या सेंट्रल कोअर कमिटींच्या सदस्यांनी सिध्दिविनायकाचे दर्शन घेतले.

आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली युवा सेनेची घोषणा केली जाणार आहे.

त्यामध्ये ठाण्याचे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांचा मुलगा पूर्वेश सरनाईक पदाधिकारी असण्याची शक्यता आहे.

close