शिवसेनेच्या दस-या मेळाव्याला मनसेचाही हातभार

October 17, 2010 12:02 PM0 commentsViews: 2

17 ऑक्टोंबर

शिवसेनेचा दसरा मेळावा यशस्वी करण्यासाठी मनसेनेही खारीचा वाटा उचलला आहे. आज शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर साजरा होतो आहे.

त्यादृष्टीने सध्या या मेळाव्याची तयारी शिवसेनेतर्फे जोरात सुरू आहे. पण सध्या शिवाजी पार्कच्या आसपासच्या जवळपास सगळ्याच रस्त्यांवर नवरात्रीच्या शुभेच्छा देणारे मनसेचे बॅनर आणि होर्डीग्ज लागले.

यासाठी दसर्‍यापर्यंत मनसेने महापालिकेची रितसर परवानगीही घेतली आहे. पण दसरा मेळाव्यासाठी आपल्या पक्षाचे होर्डीग्ज आणि बॅनर्स लावण्यासाठी शिवसेनेला या सगळ्या जागा पाहिजे होत्या.

त्यामुळे शिवसेनेचे स्थानिक विभागप्रमुख मिलींद वैद्य यांनी मनसेचे विभागप्रमुख संदीप देशपांडेंना त्यांच्या पक्षाचे बॅनर काढण्याची विनंती केली.

आणि मनसेनेही मग मनाचा मोठेपणा दाखवत हे बॅनर काढले आणि त्या ठिकाणी आता शिवसेनेचे नवे पोस्टर्स लागले आहे.

close