दीक्षाभूमीवर लोटला जनसागर

October 17, 2010 12:07 PM0 commentsViews: 44

17 ऑक्टोंबर

54 व्या धम्मचक्रप्रवर्तन दिनानिमित्त नागपूरच्या दीक्षाभूमीवर आज सकाळी बुद्ध वंदना घेण्यात आली. भन्ते नागार्जून सुरई ससाई यांच्या उपस्थितीत बुद्धवंदना घेण्यात आली.

यावेळी समता सैनिक दलाचे कार्यकर्ते, बौद्ध भिक्षू आणि बुद्ध अनुयायी लाखोंच्या संख्येने हजर होते. देश विदेशातून बौद्ध अनुयायी या ठिकाणी हजर होते.

ज्या व्यासपीठावरुन धम्मचक्रप्रवर्तन दिनाचा मुख्य सोहळा होणार आहे त्याच व्यासपीठावून ही वंदना घेण्यात आली.

आज संध्याकाळी सहा वाजता धम्मचक्रप्रवर्तन दिनाचा सोहळा होणार आहे.

close