कोची वनडे पावसामुळे रद्द

October 17, 2010 12:10 PM0 commentsViews: 1

17 ऑक्टोंबर

भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यानची पहिली वन डे पावसामुळे रद्द करण्यात आली आहे. वन डे सीरिजमधली पहिली मॅच आज कोचीला होणार होती.

पण कालपासून कोचीमध्ये पडत असलेल्या पावसामुळे मैदान ओलसर झाले होते. आज सकाळपासूनही संततधार सुरूच होती.

सकाळी अंपायरनी मैदानात येऊन पाहणी केली, त्यानंतर मॅच उशिराने खेळवण्याचा निर्णय अंपायरनी घेतला.

पण संततधार सुरूच राहिल्याने अखेर अंपायरनी ही मॅच रद्द करण्याचा निर्णय घेतला.

या सीरिजमधली दुसरी वन डे मॅच 20 तारखेला विशाखापट्टणमला खेळवली जाणार आहे.

close