संस्कृतीचे जतन करणारी रामलीला

October 17, 2010 12:16 PM0 commentsViews: 2

17 ऑक्टोंबर

नवरात्र आणि दसर्‍याला सणांदरम्यान रामलीला अनेक शहरांमध्ये पहायला मिळते. संस्कृतीचे जतन करणारी ही रामलीला सगळ्यांनाच आवडते.

अवघ्या 10 दिवसात रामायणाचा सार या रामलीलेमधून प्रेक्षकांना घडवला जातो. या रामलीलेतील कलावंत मथुरा काशीलाही जाऊन आलेले असतात.

विशेष म्हणजे रामलीला साकारण्यासाठी ते विशेष मेहनत घेत असतात.

मेकअप करणारे हे कलावंत रामलिलामधले मथुरेतुन आलेलेआहे. हे कलावंत गेली 40 वर्ष रामलीला साकारात आहे.

यंदा बदलापुरात कुळगांव बदलापुर रामलिला समिती आणि संकट मोचन हनुमान मंदिर ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने साकारली जात आहे.

यावर्षी शिवाजीपार्कच्या मैदानवार रामलीला साकराता आली नाही याची कुठलीच खंत या कलाकारंच्या मनात नाही.

एकुण 35 कलावंताचा हा ताफा रामायणातील विविध भुमिका साकारतो.

शिवाजी पार्कवर लाभणार प्रचंड प्रेक्षक वर्ग जरी बदलापुरात नसला तरी आलेल्या प्रेक्षकाला ही रामलीला पाहुन धन्यता वाटते एवढे मात्र नक्किच होय.

close