मुंबईत लोकलमध्ये झालेल्या मारहाणीत उत्तर भारतीय प्रवासी ठार

October 29, 2008 8:39 AM0 commentsViews: 4

29 ऑक्टोबर, मुंबईमुंबईत खोपोली रेल्वेस्टेशनजवळ चालत्या लोकलमध्ये झालेल्या भांडणात एका उत्तर भारतीय व्यक्तीचा मृत्यू झाला. धर्मदेव रामनारायण राय असं या व्यक्तीचं नाव आहे. आठ ते दहा जणांनी केलेल्या मारहाणीत धर्मदेवचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्यासोबत प्रवास करणार्‍या विरेंद्र राय यांनी केला आहे. खोपोलीतल्या झोपडपट्टीत राहणारे विरेंद्र कृपाशंकर राय, शिवकुमार कृपाशंकर राय, सत्यप्रकाश राय आणि धर्मदेव रामनारायण राय हे खोपोलीतून कुर्ल्याकडे निघाले होते. यावेळी लोकलमध्ये काही जणांशी धर्मदेवचा वाद झाला. या वादातून धर्मदेवला मारहाणही करण्यात आली. या मारहाणीत धर्मदेव रामनारायण राय अत्यवस्थ झाला. त्याला बाबा घनशामदास दुबे हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथे त्याला मृत घोषित करण्यात आलं. या घटनेनंतर मारहाण करणारे पळून गेल्याचं विरेंद्र यांनी सांगितलं.

close