कसाबचा शिक्षेवर सुनावणी सुरू

October 18, 2010 9:49 AM0 commentsViews: 2

18 ऑक्टोबर

मुंबईवर 26/11 रोजी झालेल्या अतिरेकी हल्ल्यातील मुख्य आरोपी मोहम्मद अजमल कसाब याला झालेल्या फाशीच्या शिक्षेचा निर्णर्य कायम व्हावा, यासाठी पोलिसांनी मुंबई हायकोर्टात अर्ज केला आहे.

यावर सुनावणीला सुरुवात झाली आहे. न्यायमूर्ती रंजना देसाई आणि न्यायमूर्ती एस.व्ही.मोरे यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होत आहे.

कसाबला हायकोर्टात प्रत्यक्ष हजर केले जाणार नसून ही सुनावणी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे होते.

कसाबला प्रत्यक्ष कोर्टात हजर केले जाणार नसले तरीसुध्दा हायकोर्ट परिसरात कडेकोट सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आलेली आहे.

सुनावणीदरम्यान न्यायालयीन कर्मचारी आणि वकिलांनाही प्रवेश नाकारण्यात आला आहे.

close