हिमायत बेगचा स्फोटक जबाब

October 18, 2010 11:22 AM0 commentsViews: 1

18 ऑक्टोबर

जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणातला आरोपी हिमायत बेगला आज नाशिक कोर्टात हजर करण्यात आलं.

त्यावेळी त्याच्याकडून तपासादरम्यान महत्वाची माहिती मिळाल्याचे एटीएसने कोर्टात सांगितले.

2008 मध्ये तो कोलंबो इथे राहिला होता, तसेच त्याला तिथे परदेशी चलन मिळाले. असंही एटीएसने कोर्टाला सांगितले.

2006 मध्ये हिमायतने बिलालला अतिरेकी ट्रेनिंगसाठी पाकिस्तानात पाठवल्याचे स्पष्ट केले.

पुण्यापाठोपाठ मुंबई, नाशिक आणि नागपूर इथे दहशतवादी कारवाया करण्याचा त्याचा कट होता, असे एटीएसच्या तपासात निष्पन्न झाले आहे.

आजच्या सुनावणी दरम्यान बिलाल आणि बेग यांच्यातल्या फोनवरच्या संभाषणाचा पुरावा एटीएसने कोर्टापुढे सादर केला.

दरम्यान बेगला 25 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

close