रुग्णालयात बलात्कार प्रकरणी डॉक्टराला अटक

October 18, 2010 11:47 AM0 commentsViews: 4

18 ऑक्टोबर

उपचारासाठी दाखल झालेल्या महिलेवर डॉक्टरने बलात्कार केल्याची घटना वाशीमध्ये घडली आहे.

याप्रकरणी या डॉक्टराला पोलिसांनी अटक केली आहे. विशाल बने असे या डॉक्टरचे नाव आहे.

वाशी इथल्या लोटस हॉस्पिटलमध्ये ही घटना घडली.

वाशी सेक्टर 15 इथं शनिवारी गरबा खेळतांना रक्तदाबाचा त्रास होऊ लागल्याने 30 वर्षाच्या युवतीला अतीदक्षता विभागात दाखल केले.

उपचार करत असताना विशाल बने या डॉक्टरने बलात्कार केला आणि मोबाईलमध्ये त्याचे अश्लील चित्रीकरणही केले.

या महिलेच्या नातेवाईकांनी वाशी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.

close