घोटाळ्यात पंतप्रधान कार्यालयाचाही हात- नितीन गडकरी

October 18, 2010 4:59 PM0 commentsViews: 1

18 ऑक्टोबर

कॉमनवेल्थ घोटाळ्यात एकटे कलमाडी दोषी नाहीत, तर या घोटाळ्यात पंतप्रधान कार्यालयाचाही हात आहे, असा आरोप भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरींनी पुण्यात केला आहे.

कॉमनवेल्थवर 70 हजार कोटीपेक्षाही जास्त खर्च झाले. त्यातल्या अनेक फाईल्सवर पंतप्रधान कार्यलयाचा शिक्का आहे, याची आठवणही त्यांनी करून दिली.

close