कसाब कॅमेर्‍यावर थुंकला

October 19, 2010 11:05 AM0 commentsViews: 1

19 ऑक्टोबर

मुंबई हल्ल्यातील एकमेव जिवंत दहशतवादी अजमल कसाबने आता आपली 'करणी' दाखवण्यास सुरुवात केली आहे.

व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी सुरू असतानाच त्याने आज कॅमेर्‍यावर थुंकण्याचा प्रयत्न केला.

कसाबने कोर्टात हजर राहण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण कोर्टाने कसाबची ही मागणी फेटाळून लावली.

व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी सुरू असताना कसाबच्या माकडचेष्टा सुरुच आहेत. कोर्ट सुरु असताना, कसाब केस विंचरत होता.

तसेच कॅमेर्‍यासमोर हातवारे करत होता. वेब कॅमेर्‍यासमोरून उठून जाण्याचा आणि त्यावर थुंकण्याचा प्रयत्नही त्याने यावेळी केला. तसेच जेलच्या अधिकार्‍यासोबत त्याने वादही घातला.

close