हेडलीचे संबंध पाकिस्तानशी

October 19, 2010 11:14 AM0 commentsViews:

19 ऑक्टोबर

दहशतवादी आणि पाकिस्तान सरकारमध्ये असलेले धोकादायक संबंध आता हेडलीच्या चौकशीतून स्पष्ट झाले आहेत.

2008 मध्ये हेडलीच्या वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांनी त्याची त्याच्या घरी जाऊन भेट घेतली होती.

दहशतवादी संघटनांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी आयएसआयवर प्रचंड दबाव टाकण्यात आला होता.

तसेच हिंसाचाराचा केंद्रबिंदू पाकिस्तानातून भारताकडे वळवण्याचा आयएसआयचा प्लॅन होता, अशी माहितीही समोर येत आहे.

मुंबईवर दहशतवादी हल्ला करण्याचा कट 2008 मधल्या रमझान महिन्याच्या दरम्यान शिजला. मात्र, दहशतवादी असलेली बोट बुडाल्यानं हा प्लॅन रद्द करण्यात आला.

close