मुद्दा घराणेशाहीचा…

October 19, 2010 11:41 AM0 commentsViews: 4

19 ऑक्टोबर

घराणेशाहीचा मुद्दा सध्या गाजत आहे. कल्याण डोंबिवली मनपा निवडणुकीतही घराणेशाही जोरात आहे.

इथे शिवसनेच्या पुंडलिक म्हात्रे यांच्या घरातील तब्बल 4 जणांना उमेदवारी मिळाली आहे.

तर पती पत्नीच्या अनेक जोड्या वेगवेगळ्या पक्षातून निवडणूक लढवत आहेत. त्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह भाजपही मागे नाही.

त्यामुळे एकूणच सत्तेची सूत्रे आपल्याच हातात राहावीत आणि घरातच दोन दोन नगरसेवक असावेत असा सगळ्यांचाच प्रयत्न दिसत आहे.

या घराणेशाहीवर एक नजर टाकूयात…

शिवसेनेच्या पुंडलिक म्हात्रे यांच्या घरात चार जणांना उमेदवारी मिळाली आहे.

त्यांच्या पत्नी रत्ना म्हात्रे, मुलगा दीपेश म्हात्रे यांच्याबरोबरच पुंडलिक म्हात्रेंचा भाचा राजेश मोरे आणि त्यांची पत्नी भारती मोरे यांनाही उमेदवारी मिळाली आहे.

रमेश म्हात्रे या शिवसेना उमेदवाराबरोबरच त्यांच्या पत्नी गुलाब म्हात्रे यांनाही सेनेची उमेदवारी मिळाली आहे.

इतर पक्षही मागे नाहीयेत….

सचिन पोटे आणि त्यांची पत्नी जान्हवी पोटे या जोडीला काँग्रेसची उमेदवारी मिळाली आहे. काँग्रेसने अशी आघाडी घेतल्यावर राष्ट्रवादी तरी कशी मागे राहील…

राष्ट्रवादीने अभिमन्यू गायकवाड आणि मनिषा गायकवाड या दांपत्याला उमेदवारी बहाल केली आहे. तर दुसरीकडे आणखी एक पती पत्नीची जोडी आहे.

त्यात शिवसेनेकडून जनार्दन म्हात्रे यांना, तर भाजपकडून त्यांच्या पत्नी रेखा म्हात्रे यांना उमेदवारी मिळाली आहे.

close