‘कॉमनवेल्थमधील पैसा बेनामी कंपन्यांमध्ये’

October 19, 2010 11:47 AM0 commentsViews: 4

19 ऑक्टोबर

कॉमनवेल्थ स्पर्धेत कमालीचा भ्रष्टाचार झाल्याचा असा आरोप भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी यांनी केला आहे.

कॉमनवेल्थ स्पर्धेतला भ्रष्टाचाराचा पैसा स्वीस बँकेमार्फत अनेक बेनामी कंपनीत जमा करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे..

कॉमनवेल्थ प्रकरणी भाजपच्या मुख्यालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.

आता या भ्रष्टाचारासंदर्भात केंद्र सरकारला जाब विचारण्याची वेळ आली आहे, असेही ते म्हणाले.

स्पर्धेच्या बजेटचा प्रत्येक फॉर्म पंतप्रधान कार्यालयातूनच मंजूर होत होता, असे म्हणत त्यांनी थेट पंतप्रधान कार्यालयालाच लक्ष्य केले आहे.

येत्या संसद अधिवेशनात भाजप कॉमनवेल्थ घोटाळ्याचा प्रश्न उपस्थित करणार असल्याचा इशाराही गडकरी यांनी दिला आहे.

भाजपकडे भ्रष्टाचाराचे पुरावे असल्याची माहिती त्यांनी दिली. याविरोधात भाजप रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.

close