आंबेडकरांची बाळासाहेबांवर टीका

October 19, 2010 11:53 AM0 commentsViews: 4

19 ऑक्टोबर

'असभ्य भाषेत बोलणे शिवसेनाप्रमुखांना शोभत नाही' या शब्दात भारीप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

ते अकोल्यात बोलत होते. तसेच केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्यावरही त्यांनी टीकेची झोड उठवली आहे. वेगळ्या विदर्भाच्या बाजूने जे कुणी राष्ट्रवादीचे नेते आहेत ते पवारांना घाबरतात.

त्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. त्यांना मी लवकरच एक्सपोज करणार आहे, अशा शब्दांत प्रकाश आंबेडकरांनी पवारांवर शरसंधान साधले.

close