शिक्षणसेवकांना मिळणार पूर्ण वेतन

October 19, 2010 12:00 PM0 commentsViews: 3

19 ऑक्टोबर

शिक्षणसेवकांनी तीन वर्षांची सेवा समाधानकारकरित्या पूर्ण केल्यास त्यांना पूर्ण वेतन सुरू होईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात यांनी नंदुरबारमध्ये दिली.

याबाबतचा जीआर सरकारने काढला आहे, असेही ते म्हणाले. यामुळे राज्यभरातील सुमारे 60 हजार शिक्षणसेवकांना दिलासा मिळाला आहे.

शिक्षणसेवकांनी तीन वर्ष पूर्ण केल्यानंतरही त्यांना पूर्ण वेतन सुरू होण्यास सहा महिन्यांपेक्षा जास्त वेळ लागत असे.

तर आता नव्या जीआरमुळे शिक्षण सेवकांची आर्थिक ओढाताण थांबणार आहे.

close