कृष्णा आणि दानी येणार आमने-सामने

October 19, 2010 12:25 PM0 commentsViews: 6

19 ऑक्टोबर

कॉमनवेल्थ गेम्समध्ये थाळीफेक स्पर्धेत भारताच्या कृष्णा पुनियाने गोल्ड मेडल जिंकले होते.

पण हे यश तिने मिळवले वर्ल्ड चॅम्पियन दानी सॅम्युअल्सच्या गैरहजेरीत. दानीने सुरक्षेच्या कारणावरुन कॉमनवेल्थमधून माघार घेतली होती.

आता या दोघी आमनेसामने येणार आहेत, वीस हजार अमेरिकन डॉलर एवढ्या किंमतीच्या एका ऍथलेटिक्स स्पर्धेत. पुनियाने कॉमवेल्थ गोल्ड जिंकल्यानंतर दानीचा फॉर्म सध्या खराब असल्यामुळेच ती क़मनवेलथमध्ये खेळली नाही, असे म्हटले होते.

त्यामुळे दानी सध्या दुखावली आहे. आणि कृष्णा पुनियाशी दोन हात करायला ती उत्सुक आहे. त्यामुळे दोघींमधील या मुकाबल्याला रिव्हेंज मुकाबला म्हटले जात आहे.

कृष्णाही दानीशी दोन हात करायला तयार आहे, असे तिचा कोच आणि नवरा विरेंद्र पुनियाने म्हटले आहे.

कॉमनवेल्थमध्ये कृष्णाने 61 पूर्णांक 51 शतांश मीटर एवढी लांब थाळीफेक करत गोल्ड जिंकले होते.

52 वर्षांत कॉमनवेल्थमध्ये ऍथलेटिक्समध्ये गोल्ड जिंकणारी ती पहिली भारतीय ठरली.

close