हिरानंदानी बंधूंवर भ्रष्टाचाराबद्दल आरोपपत्र

October 19, 2010 2:21 PM0 commentsViews: 5

19 ऑक्टोबर

निरंजन आणि सुरेंद्र या हिरानंदानी बंधूंवर भविष्यनिर्वाह निधीत भ्रष्टाचार केल्याप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

9 कोटी 3 लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी सीबीआयने हे आरोपपत्र दाखल केले. यासाठी सीबीआयने 45 हजार पानाचे आरोपपत्र तयार केले.

दोन्ही हिरानंदानी बंधूंवर फसवणूक आणि अपहार केल्याचा आरो़प ठेवण्यात आला आहे.

तसंच भविष्यनिर्वाह निधीत भ्रष्टाचार केल्या प्रकरणात ते दोषी आढळलेत.

तर इतर 26 जणांविरोधात चार्जशीट फाईल करण्यात आलंय.

त्यातले चार सरकारी कर्मचारी आहेत तर यामध्ये 18 कॉन्ट्रॅक्टर कंपन्यांचाही समावेश आहे.

close