अंधश्रद्धेतून बापलेकाचा बळी

October 19, 2010 3:21 PM0 commentsViews: 1

19 ऑक्टोबर

पुणे जिल्ह्यातील माझगाव येथे अंधश्रद्धेमुळे पिता-पुत्रांचा नाहक बळी गेला आहे.

चौघा चुलत भावांनी मिळून आपल्याच काका आणि भावाचा खून केल्याची ही घटना वेल्हा तालुक्यातील माझगावात घडली.

विठ्ठल वर्हे आणि सुनिल वर्हे अशी मृतकांची नावे आहेत.

विठ्ठल वर्हे यांनी करणी करून कुटुंबातील काही जणांचा खून केला, अशी समजूत करून घेऊन कैलास वर्हे, नरेश वर्हे, बाजीराव वर्हे आणि एकनाथ वर्हे या चौघांनी दगड, काठ्या आणि धारदार शस्त्राने सोमवारी त्यांच्यावर हल्ला केला.

हा प्रकार समजताच त्यांचा मुलगा सुनिल तिथे दाखल झाला. तर या चौघांनी त्याचीही हत्या केली.

दरम्यान पोलिसांनी चौघांनाही अटक केली आहे.

close