भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान आज तिसरी टेस्ट

October 29, 2008 8:51 AM0 commentsViews: 6

29 ऑक्टोबर, पुणेआजपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातली तिसरी टेस्ट नवी दिल्लीतल्या फिरोज शाह कोटला या मैदानावर होत आहे.या स्टेडियमवर भारतानं सलग 7 टेस्ट जिंकल्या आहेत. इतिहास भारताच्या बाजूनं असला तरीही ऑस्ट्रेलियाकडून जोरदार प्रतिकाराची अपेक्षा आहे.आपल्या तंदुरूस्तीबद्दलच्या सगळ्‌या शंकांना पूर्णविराम देत कॅप्टन कुंबळेनं आपण फिट असल्याचं जाहीर केलं. आहे मोहालीमधल्या जबरदस्त कामगिरीनंतरही अमित मिश्राला मात्र बाहेर बसाव लागणार आहे. पण हरभजन सिंग जर पायाच्या दुखापतीतून बरा झाला नाही तरच त्याला संधी मिळू शकते. सगळ्यांचं लक्ष्य मात्र कुंबळे कडे आहे. त्याच्यावर नक्कीच दडपण असणार जे न दाखवण्याचा तो आटोकाट प्रयत्न करत आहे.आश्चर्य म्हणजे कॅप्टन कुंबळेवर कमी दडपण आहे. ऑस्ट्रेलियामध्ये चर्चा आहे की रिकी पाँटिंग कॅप्टन झाल्यापासून त्याची ही सर्वात कठीण टेस्ट असणार आहे. पण असं असलं तरी त्यानं चेहर्‍यावरचं हास्य अजूनही मावळू दिलं नाही. आता त्याला गरज आहे ते त्याच्या भरवशाच्या खेळाडूंनी चांगली कामगिरी करण्याची. आणि पाँटिंगला विश्वास वाटतो की त्याची टीम सिरिजमध्ये कम बॅक करेल. ऑस्ट्रेलियासाठी ही सिरिज वाचवण्याची त्यांना शेवटची संधी आहे. त्यामुळे या टेस्टमध्ये त्यांच्याकडून कडव्या प्रतिकाराची अपेक्षा आहे.

close