शाळांमधील सुगंधी दूध पिण्यायोग्य नाही

October 20, 2010 10:44 AM0 commentsViews: 3

20 ऑक्टोबर

मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये वाटण्यात येणारे सुगंधी दूध पिण्यायोग्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

मालाडमध्ये काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या शाळेत काही विद्यार्थ्यांना दुधातून विषबाधा झाली होती. त्यानंतर चौकशीसाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती.

विषबाधा झालेल्या दुधाच्या नमुन्यांच्या तपासणीतून हे दूध पिण्यायोग्य नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे या समितीने हे दूध पिण्यायोग्य नसल्याचा अहवाल दिला आहे.

close