जुन्या गाड्यांवर आता पर्यावरण कर

October 20, 2010 12:57 PM0 commentsViews: 3

20 ऑक्टोबर

महाराष्ट्र सरकारने पर्यावरण कराचा अध्यादेश काढला आहे. व्यापारी वापराच्या 7 वर्षे जुन्या वाहनांसाठी आणि खाजगी वापराच्या 15 वर्ष जुन्या वाहनांसाठी हा पर्यावरण कर असणार आहे.

कमर्शियल वाहनांसाठी वर्षातून एकदा तर खासगी वाहनांना पाच वर्षातून एकदा हा कर भरावा लागणार आहे.

मोटरसायकलसाठी 2000 रुपये, गाड्यांसाठी 3000 रुपये, तर अवजड वाहनांसाठी साडे तीन हजार रुपये कर आकारला जाणार आहे.

जुन्या वाहनांमुळे जास्त प्रदूषण होते, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय असे सरकारने स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्रात सध्या 1 कोटींपेक्षा जास्त गाड्या आहेत. त्यापैकी 80 टक्के दुचाकी तर 10 टक्के खाजगी गाड्या आहेत.

तर उरलेल्या 10 टक्के व्यापारी तत्वावर चालणार्‍या गाड्या आहेत. यामधून मिळालेला महसूल राज्य सरकार हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी खर्च करणार आहे.

याआधी कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि हिमाचल प्रदेशमध्ये अशा प्रकारचा टॅक्स आकारला गेला आहे.

कर्नाटकमध्ये 2002 पासून ग्रीन टॅक्स घेतला जात आहे. त्यावरच आधारीत हा नवा टॅक्स असणार आहे

राज्यात सध्या 1 करोड 60 लाख जुन्या वाहनांपैकी 25 टक्के वाहने 15 वर्षांहून अधिक जुनी आहेत.

15 वर्षांहून अधिक जुन्या खासगी वाहनांना 5 पाच वर्षांतून एकदा ग्रीन टॅक्स भरावा लागणार आहे.

तर 8 वर्षांहून अधिक जुन्या कमर्शियल वाहनांना दरवर्षी ग्रीन टॅक्स भरावा लागेल.

close