घराणेशाहीवरील टीकेला उद्धव यांचे उत्तर

October 20, 2010 1:08 PM0 commentsViews: 2

20 ऑक्टोबर

आदित्य ठाकरेंना युवा सेनेचे अध्यक्ष केल्यानंतर शिवसेनेवर घराणेशाहीची टीका होत आहे.

या टीकेला आज उद्धव ठाकरेंनी कोल्हापूरमध्ये उत्तर दिले. अदित्य ठाकरेंना जनतेसमोर आणले आहे.

त्याला स्वीकारायचे की नाही हे जनताच ठरवेल, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

तसेच इतर नेत्यांच्या मुलांप्रमाणे अदित्यला आमदार-खासदार करणार नाही, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.

कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेने आज वचननामा जाहीर केला.

close