लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये महिलेला पोटगी नाही

October 21, 2010 8:17 AM0 commentsViews: 2

21 ऑक्टोबर

लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये महिलेला पोटगी मिळणार नाही असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे.

या रिलेशनशिपमधून महिला बाहेर पडली तर पोटगी देणं बंधनकारक नाही.

14 वर्षांच्या लिव्ह इन रिलेशनशिपमधून बाहेर पडल्यानंतर महिलेने पोटगी मिळवण्यासाठी दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली होती.

या याचिकेवर हायकोर्टाने महिलेला पोटगी देण्याचा निर्णय दिला होता. या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलं होत.

यावर सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला आहे.

close