मंदीमुळे ब्रोकरेज फर्मवर कॉस्ट कटिंगची आपत्ती

October 29, 2008 9:05 AM0 commentsViews: 18

29 ऑक्टोबर, मुंबईश्वेतांक जैनशेअर मार्केटमधल्या मंदीचा फटका छोट्या ब्रोकरेज कंपन्यांनाही बसत आहे. इतर कंपन्यांप्रमाणेच या कंपन्यांनीही कॉस्ट कटींग करायला सुरूवात केली आहे. सेन्सेक्सच्या उतरत्या आलेखानं गुंतवणूकदारांच्या कोट्यावधी रुपयांचं नुकसान केलं आहे. ग्राहकांना गुंतवणूक करण्यासाठी मदत करणार्‍या अनेक ब्रोकरेज हाऊसेसनाही त्याचा फटका बसला आहे. याच कारणामुळे अनेक ब्रोकरेज हाऊसना त्यांची ब्रॅन्च बंद करण्याची वेळ आली आहे. तिथल्या कर्मचार्‍यांच्या पगारातही कपात करण्यात आली आहे. शेअरखान सिक्युरिटीजनं कर्मचार्‍यांच्या पगारात वीस टक्क्यांची कपात केली आहे. आनंद राठी सिक्युरिटीजनं सध्या त्यांच्या काही ब्रॅन्चेस बंद केल्या आहेत. त्याशिवाय त्यांच्या काही नवीन कर्मचार्‍यांना कामावरून काढूनही टाकण्यात आलं आहे. मागच्या दोन- तीन वर्षात अनेक ब्रोकिंग फर्म उघडण्यात आल्या.अनेक लोकांना बड्या पगारावर ठेवण्यातही आलं होतं.पण आता या नव्या ब्रॅन्चेस ब्रोकिंग हाऊसेसना चालवणं शक्य नाही. त्यामुळे आता शेअरमार्केटध्ये पुन्हा तेजी कधी येईल याचीच ते वाट पाहत आहेत.

close