परभणीमध्ये डीएडचा पेपर दुसर्‍यांदा फुटला

October 21, 2010 7:41 AM0 commentsViews: 2

21 ऑक्टोबर

परभणी इथं डी.एडचा दुस-या वर्षाचा इंग्रजीचा पेपर दुसर्‍यांदा फुटला आहे. आज दुपारी 2 वाजता हा पेपर होता.

काल रात्रीपासूनच विद्यार्थ्यांना फॅक्सद्वारे ही प्रश्नपत्रिका विक्रीसाठी उपलब्ध आहे.

जिल्हयातील बर्‍याच विद्यार्थ्यांकडे ही प्रश्नपत्रिका पोहोचली आहे. यातली गंभीर बाब म्हणजे याआधीही 27 सप्टेंबरला इंग्रजी विषयाचा पेपर फुटला होता.

त्यामुळे हा पेपर पुढे ढकलण्यात आला होता. मात्र पुन्हा एकदा हा पेपरफुटीच्या वृत्तामुळे विध्यार्थी गांेधळात पडले आहेत.

आजचा पेपर होणार की नाही याविषयी अजूनही निश्चित माहिती मिळालेली नाही.

close